Amalner people Joy of Yatra to Ambarshi Hill Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरकरांनी लुटला अंबर्षी टेकडीवर यात्रेचा आनंद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आषाढी द्वादशीला शहराच्या पूर्वेला अंबर्शी टेकडीवर हजारो भाविकांनी अंबरीश राजा व विष्णुदेवाचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंद लुटला.

आषाढी द्वादशीला पांडुरंग अमळनेरात येत असतात, अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्ताने अंबर्षी टेकडीवर यात्रा भरते. (Amalner people Joy of Yatra to Ambarshi Hill Jalgaon News)

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे फुग्याच्या काकड्या हवेत किर्रर्र वाजवणे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत काकड्या वाजवण्याचा आनंद घेत असतात.

टेकडीवर हजारो झाडे लावण्यात आली असून, नैसर्गिक जंगलात विविध खाद्य पदार्थ, पाळणे, खेळण्याची दुकाने, शोभेच्या वस्तू, झुले यांची दुकाने लागलेली होती.

थंडगार हवेत गरमागरम भजी, पाथरा, कचोरी, जिलेबीवर ताव मारण्यात आला. परंपरेप्रमाणे भगत गुरू सोनवणे यांनी घरापासून घुमत येत टेकडीवरील अंबरीश राजाच्या मंदिरावर ध्वज लावला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT