The amount of incentive scheme for The amount of incentive scheme for entrepreneurs in Jalgaon district will be increased.jpgThe amount of incentive scheme for entrepreneurs in Jalgaon district will be increased.j in Jalgaon district will be increased.jpg 
जळगाव

उद्योजकांना वाढीव प्रोत्साहन योजनेचा लाभ; उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे आश्वासन

कैलास शिंदे

जळगाव : जिल्ह्यातील उद्योजकांना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मिळणाऱ्या प्रोत्साहन योजनेच्या प्रमाणात आता वाढ होणार असून, याचा उद्योजकांना लाभ होणार आहे. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गांभीर्याने दखल घेऊन आश्वासन दिले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला असून, याच्या माध्यमातून औद्योगिक प्रगतीसह जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र हे २०१३ पर्यंत ‘डी प्लस’ या वर्गवारीत होते. यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन योजनेचा ७० टक्के इतका लाभ मिळत होता. तर २०१९ मध्ये मात्र जिल्ह्यातील उद्योग हे ‘डी’ या वर्गवारीत टाकण्यात आल्याने लाभाचे प्रमाण हे ५० टक्क्यांवर आले आहे. याचा जिल्ह्यातील उद्योजक तसेच गुंतवणुकदारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यातील उद्योजकांनी साकडे घातले होते. याची दखल घेऊन श्री. पाटील यांनी तातडीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा, विनिमय करून निवेदन देत जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आधीप्रमाणेच ‘डी प्लस’ या वर्गवारीत टाकून त्यांना ८० टक्के इतक्या प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. 

तसेच राज्य शासनाने १६ सप्टेंबर २०१९ च्या सा.प्रायो. २०१९ शासन निर्णय क्रमांक पीएसआय-२०१९/सीआर/४८/आयएनडी/८ या शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी केली. यात धुळेऐवजी उत्तर महाराष्ट्र हा उल्लेख करावा, असे नमूद करण्यात आले आहे. असे झाल्यानंतर जिल्ह्यातील उद्योजकांना आधीप्रमाणेच ८० टक्के प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे. यावर उद्योगमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश दिल्याने हा प्रश्‍न कायमचा मार्गी लागणार असल्याने उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT