Anandacha Shidha esakal
जळगाव

Anandacha Shidha: गरिबांचा गुढीपाडवा गोड करणारा आनंदाचा शिधा पोचलाच नाही; शासनाच्या घोषणेचे काय?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडव्यासाठी रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा (रवा, साखर, तेल, हरभरादाळ) शंभर रुपयांत देण्याचे ठरविले होते. अवघ्या एक दिवसांवर गुढीपाडवा आला आहे.

सर्वसामान्यांना गुढीपाडव्यापूर्वी ‘आनंदाचा शिधा’ मिळेल, अशी आशा होती. मात्र, रेशन दुकानांवर अद्यापही आनंदाच्या शिधाचे किट पोचलेलेच नाहीत. यामुळे गरिबांचा गुढीपाडवा ‘कडू’ होण्याची चिन्हे आहेत.

गरिबांना मराठी नवीन वर्षाला महागाईची झळ नको, म्हणून राज्य शासनाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती.

राज्यातील एक कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. काहींना दिवाळीत, तर काहींना दिवाळीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळाला होता.

‘आनंदाचा शिधा’ पाकिटावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नव्हते. यामुळे ती पाकिटे परत मागविली होती, तर काही ठिकाणी साखर, तेल न मिळताच शिधावाटप झाले होते. यामुळे ‘आनंदाचा शिधा’ चांगलाच गाजला होता.

आता परत गुढीपाडव्याला ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने रेशन कार्डधारकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. अवघ्या एक दिवसावर गुढीपाडवा आला आहे. पाडव्यापूर्वी रेशन कार्डधारकांना शिधा देणे आवश्‍यक आहे.

मात्र, पुरवठा विभागाकडे अद्याप राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’चे संच उपलब्ध झालेले नाहीत. ते आल्यानंतर प्रत्येक रेशन दुकानदारास कार्डच्या संख्येच्या प्रमाणात शिधा पोचविण्यात येणार आहे.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार प्राधान्य गटात चार लाख ९० हजार ६४०, अंत्योदय गटात एक लाख ३४ हजार ३५७ कार्डधारक, अशा एकूण सहा लाख २४ हजार ९९७ कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे.

''शासनाच्या निर्णयानुसार गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केवळ एकदाच ‘आनंदाचा शिधा’ किट रेशन कार्डावर मिळेल. पुरवठादारांकडून ‘आनंदाचा शिधा’ किट अद्याप आलेले नाहीत. ते दोन-तीन दिवसांत येतील, असे सांगण्यात आले आहे. आले की रेशन दुकानात पाठवू.'' -सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT