Anjani river sakal
जळगाव

'अंजनी' नदीपात्रातून निघाला तीन ट्रॉली कचरा

‘अंजनी’च्या स्वच्छता मोहीम; विविध संघटनांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पालिकेतर्फे सुरू केलेल्या अंजनी नदीपात्राच्या स्वच्छता उपक्रमात शहरातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. पालिकेतर्फे दोन दिवसांत नदीपात्राची जलदगतीने स्वच्छता करण्यात येत असून, स्वत: मुख्याधिकारी विकास नवाळे, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, आनंद दाभाडे यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित राहून सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

मुख्याधिकारी नवाळे यांनी पालिकेतर्फे नदीपात्राची स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरू केला असून, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होत आहेत. नदीपात्राची स्वच्छता केल्यानंतर पात्रालगत वृक्षारोपण केले जात असल्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे. पालिकेने केलेल्या आवाहनास बजरंगदल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, भाजप, विवेकानंद केंद्र, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन नदीपात्रातील सुमारे तीन ट्रॉली प्लास्टिक कचरा व घाण जमा करून त्याची विल्हेवाट लावली.

माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बजरंग दलाचे अखंड संयोजक भरत महाजन, भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे भूषण चौधरी, विवेकानंद केंद्राचे प्रा. जी. आर. महाजन, भाजप युवा मोर्चाचे सुनील चौधरी, प्रकाश पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गणेश पाटील, सागर मराठे, विकी ढाकणे, लोकेश महाले, हेमंत सोनार, प्रशांत माळी, गौरव महाले, राहुल राजपूत, यशवंत वाघ, शुभम मोराणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

तसेच अनेक महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली. पालिकेने माझी वसुंधरा बचाव उपक्रमात स्वच्छता व वृक्षारोपण यावर भर दिला असून, नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे. शहरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवकांनी स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी नवाळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT