light bill  sakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्याचे ‘महावितरण’चे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने प्रयत्‍न सुरू केले आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. (Appeal of Mahavitaran to farmers to pay electricity bill jalgaon news)

याचबरोबर शेतकऱ्यांनीही कृषिपंपांचे वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महा‍वितरणने सूक्ष्म नियोजन केले आहे.‍

कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते लवकरात लवकर बदलून देत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही रोहित्र जळू नये वा नादुरुस्त होऊ नये, यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जितक्या अश्वशक्तीसाठी वीजजोडणी मंजूर झाली आहे, तितक्याच अश्वशक्तीचा कृषिपंप शेतकऱ्यांनी वापरावा. तसेच अनधिकृत वीज वापरू नये, जेणेकरून आपले रोहित्र सुस्थितीत राहील व अतिभारामुळे ते जळणार नाही.

मार्चपर्यंत ३० टक्के सवलतीचा लाभ घ्या

दरम्यान, महावितरणतर्फे २०२१ पासून महाकृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आली होती. ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे ‘महावितरण’ने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT