Jalgaon RTO  esakal
जळगाव

Jalgaon RTO News : ‘आरटीओ’साठी नव्या आकृतिबंधास मान्यता; पद भरतीच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon RTO News : गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्याची मागणी पूर्णत्वास येऊन जळगावात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. आता त्यासाठीचा आवश्‍यक १०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे.

यापूर्वी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या अधनिस्त होते.

आता जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र आरटीओचा दर्जा प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील संबंधित कामे गतीने होतील, अशी अपेक्षा आहे. (Approval of new format for RTO in jalgaon news)

गेल्या काही वर्षांपासून जळगाव कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा मिळण्यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू होता. जळगावसह राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘आरटीओ’चा दर्जा देण्याबाबत शासनाने २३ जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली. यात जळगावसह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई), सातारा या कार्यालयांना आता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा असेल.

पदभरतीच्या सूचना

दर्जा बदलल्याने नव्याने निर्माण होणारी पदे व अतिरिक्त भरावयाच्या पदांचे फेरवाटप, नियुक्ती, नवीन पद भरती, त्यांचे वेतन व भत्ते याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निधीची तरतूद करावी. त्यास शासनाची मंजुरी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या निर्णयाद्वारे दिल्या आहेत.

जळगावात १०० पदे

जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा बहाल केल्यानंतर आता त्यासाठी आवश्‍यक १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या पदांची भरती प्रक्रियाही लवकरच राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नव्या आकृतिबंधातील पदे अशी

प्रादेशिक परिवहन अधिकारी : १

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी : १

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : ४

मोटार वाहन निरीक्षक : २४

लेखाधिकारी : १

प्रशासकीय अधिकारी : १

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक : ३०

लघुलेखक (निम्नश्रेणी) : १

कार्यालयीन अधीक्षक : ३

वरिष्ठ लिपिक : १०

लिपिक-टंकलेखक : २०

वाहनचालक : ४

एकूण पदे : १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT