Gulabrao patil helped in water supply scheme esakal
जळगाव

Jalgaon : जिल्ह्यातील 55 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य व केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत शनिवारी (ता. १८) जिल्ह्यातील ५५ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी तब्बल ५७ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनांच्या माध्यमातून मंत्री पाटील यांनी आधीप्रमाणेच मंत्रीपदाच्या आपल्या दुसऱ्या टप्प्यात या योजनेला प्रचंड गती दिली आहे. (Approval of water supply schemes of 55 villages in district Jalgaon Latest Marathi News psl98)

या योजनेचा पहिला टप्पा जिल्ह्यात अतिशय यशस्वीपणे पार पडला. दुसरा टप्पादेखील याच तडफेने शंभर टक्के यशस्वी होईल, असे मंत्री पाटील सांगितले. गेल्या पंधरवाड्यात ८९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देऊन यासाठी ५८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती.

त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ९५६ योजनांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली असून त्यापैकी तब्बल ८५२ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यापैकी ७५९ कामांचे टेंडर काढण्यात आले असून ३४४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी मंत्री पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि. प. सीईओ डॉ. पंकज आशिया, पाणीपुरवठा अभियंता जी. एस. भोगवाडे आदी उपस्थित होते.

या गावातील योजनांना मंजुरी

अमळनेर तालुका : एकरुखी.

चाळीसगाव तालुका : अलवाडी, कृष्णापूरी, लोंढे, जावळे, पिंपळवाड निकुंभ, वरखेडे खुर्द.

चोपडा तालुका : गलंगी, वढोदे, धनवाडी, घुमावल खुर्द, अन्वरदे खुर्द, घोडगाव.

जळगाव तालुका ः पळसोद, धानोरे खुर्द, ममुराबाद, मोहाडी, विटनेर.

जामनेर तालुका : लोणी, पिंपळगाव कमानी, दोंदवाडे, रामपुरा, चिलगाव.

धरणगाव तालुका : बोरखेडा, बोरगाव खुर्द, वाकटूकी व धानोरे.

पाचोरा तालुका : कोकडी.

मुक्ताईनगर तालुका : टाकळी, चारठाणा, पिंप्राळा, पातोंडी, पिंप्रीनादु, मानेगाव, लोहारखेडा, मनारावेल, बोदवड, रिगाव, धाबे, मेहूण, धापुरी, चिंचोल, काकोडा.

रावेर तालुका : .दसनूर, अजंदे.

भुसावळ तालुका : भिलमळी, मांडवेदिगर, निंभोरा खुर्द, हतनूर.

बोदवड तालुका : जलचक्र खुर्द व जलचक्र बुद्रुक.

भडगाव तालुका : भोरटेक, उमरखेडा, वलवाडी बुदुक व खुर्द, गिरड.

यावल तालुका : हंबर्डी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT