Gang Fight
Gang Fight esakal
जळगाव

Jalgaon : हॉटेल ट्यूरिस्टबाहेर सशस्त्रटोळ्या भिडल्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील हॉटेल ट्यूरिस्टसमोर मंगळवारी (ता. २८) दुपारी दोन सशस्त्र टोळ्या (Armed Gangs) समोरासमोर भिडल्या. त्यांच्यात घमासान होण्यापूर्वीच पोलिस धडकले अन्‌ पुढील अनर्थ टळला. संशयित पळून गेले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Armed mobs clash outside hotel tourists in jalgaon Crime News)

जैनाबाद परिसरातील लाडू गँगचा गण्या आणि प्राणघातक हल्लाप्रकरणी कारागृहात असलेल्या सतीश गायकवाड यांना जिल्‍हा न्यायालयात आणले होते. एकमेकांना खुन्नस देण्यावरून शिवीगाळ झाली. नंतर दोन्ही गटाच्या टोळ्यांना बोलाविण्यात आले. हॉटेल ट्यूरिस्‍टसमोरच दोन्ही टोळ्या समोरासमोर आल्या. त्यांच्या हातात चॉपर, तलवारी पाहून नागरिकांनी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना माहिती दिली. दोन्ही टोळ्या एकमेकांत भिडण्याआधीच पोलिस गाड्या धडकल्या. पाठेापाठ सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, गुन्हेशोध पथकाचे कर्मचारी पोचले. पोलिसांचा सुगावा लागताच दोन्ही टोळ्या मिळेल त्या मार्गाने पसार झाल्या.

मात्र, परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिसरातील काही दुकानांबाहेरील सीसीटीव्ही फुटेजवरून गणेश रवींद्र सोनवणे, अक्षय पाटील, गणेश सोनवणे ऊर्फ जग्गू, साबू, अण्णा राठोड, दीपक सुकलाल सोनवणे, सुनील रसाल, राठोड (सर्व रा. कांचननगर), गौरव गायकवाड (रा. समतानगर) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दंगल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार विजय निकुंभ तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT