Arrested esakal
जळगाव

Jalgaon Crime: अडावदला 11 तलवारींसह शस्त्रे जप्त; 5 अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : येथील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तब्बल ११ तलवारी व दोन धारदार गुप्त्या संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आहे. पोलिस संशयितांची कसून चौकशी करीत आहेत. (Arms seized from Adavad including 11 swords 5 in custody Jalgaon Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अडावद पोलिस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित सागर भगवान महाजन (वय २२, रा.अडावद), राहुल लक्ष्मण ठाकरे (१९, रा.सुटकार), राज प्रमोद ठाकूर (२१, रा. लोणी, ता. चोपडा), चिरंजीव रवींद्र भोई (१९, रा.अडावद), मयूर रामेश्वर कोळी (२०, रा.अडावद) यांच्याकडून एकूण ११ धारदार तलवारी व २ धारदार गुप्त्या अशी एकूण १३ हत्यारांसह १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी रविवारी (ता. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक जगदीश कोळंबे,

उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक फौजदार शरीफ शेख, मुकेश तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, सुनील तायडे, नासिर तडवी, विनोद धनगर, फिरोज तडवी, किरण शिरसाठ, सतीश भोई, प्रदीप पाटील, शुभम बाविस्कर, संदीप पाटील, शैलेश माळी, रमिज सय्यद यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: आता लढायचं, पक्ष कुठला ते नंतर बघू: रामराजे नाईक-निंबाळकर; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News : महाराष्ट्राला केंद्राकडून १५६६ कोटींची मदत; पूरग्रस्तांसाठी दिलासा

Satara Maratha Community: 'सातारा गॅझेटियर तत्काळ लागू करा'; मराठा समाज बांधव आक्रमक, अन्यथा उपोषण सुरू करण्याचा इशारा

Morning Breakfast Recipe: जर घरातील लोकांना एकाच प्रकारच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल तर ट्राय करा ओट्स ढोकळा अन् पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT