Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : सहा महिन्यांत दामदुप्पट रक्कम करून देतो, असे सांगून चार लाखांत फसवणूक करणाऱ्या ठकसेनला येथील पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. दरम्यान, त्याने येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला.

याबाबत माहिती अशी : उंबरखेडे (ता. चाळीसगाव) येथील पुंडलिक दौलत पाटील यांची नागपूर येथील संजय विठोबाजी उमाटे याने सहा महिन्यांत दामदुप्पट रक्कम करून देतो, असे सांगून चार लाख दोन हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. (Arrested for luring double Amount Jalgaon Crime News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

त्यानंतर पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक दीपक बिरारी यांनी फिर्यादी पुंडलिक पाटील यांना सोबत घेऊन नागपूर गाठले व तेथे जाऊन संशयित उमाटे याला अटक केली.

येथील न्यायालयात त्याला हजर केले असता, सुरवातीला न्यायालयाने २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यादरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये जप्त केले. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केल्यानंतर संशयित उमाटे याने जामिनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने तो नामंजूर केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT