JAMNER CYCLOEN SAKAL
जळगाव

आर्या फाउंडेशनतर्फे चक्रीवादळग्रस्तांना मदत

दिवाळीच्या आधीच एकूण ५० कुटुंबांना महिनाभराचे किराणा सामानाचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणारी जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था या शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावून आली. या कुटुंबांची दिवाळी सुखकर जावी, या हेतूने दिवाळीच्या आधीच एकूण ५० कुटुंबांना महिनाभराचे किराणा सामान आर्या फाउंडेशनतर्फे देण्यात आले.

जामनेर तालुक्यातील सामरोद, मांडवे, कापूसवाडी, ढालसिंगी, भागदरा, नांद्राहवेली या गावांतील एकूण ५० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जामनेर येथील पाटील ट्रेडर्स येथे किराणा सामानाचे वितरण करण्यात आले. गेल्या आठवड्यात संजयकुमार पाटील आणि किरण पाटील यांनी वरील गावांना भेट देत योग्य त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्यानुसार प्रत्येक कुटुंब प्रमुखाला जामनेर येथे आमंत्रित करून वरील साहित्य देण्यात आले.

आर्या फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तालुक्यातील अन्य नुकसानग्रस्त कुटुंबांनादेखील मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी आर्या फाउंडेशनला आर्थिक मदत पोचविणाऱ्या सर्व दानशूरांचे आभार मानले. संजयकुमार पाटील, किरण पाटील, जितेंद्र पाटील, ललित जैन, संजित पाटील, पूनम पाटील, आर्या पाटील, गजानन कचुवा, भूषण चौधरी, मुकेश शिवदे, सचिन सपकाळे, शरद लाव्हरे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Innodata Layoff News: लंच ब्रेकनंतर परतले अन् नोकरीच गेली! 550 भारतीय कर्मचाऱ्यांची कंपनीतून कपात? नेमकं काय झालं?

Koyna Bird Deaths : कराडमध्ये निसर्गाचा गूढ प्रकोप! मृत कासवाजवळ जमले अन् 35 पक्षी काही मिनिटांतच कोसळले; कोयना नदीपात्राजवळ काय घडलं? विषबाधा की आणखी काही?

एकही रुपया मिळणार नव्हता, तरी तरुणीने स्वीकारलं १०० पाणीपुरी खाण्याचं आव्हान; पुढे काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

Virar Crime: विरारमध्ये बहिणीसह २ भावांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, मोबाईलमध्ये मृत्यूआधीचा व्हिडीओ; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT