Assembly election NCP sakal
जळगाव

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्षसंघटनासाठी कामाला लागावे. येत्या विधानसभा निवडणुका नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सरचिटणीस गर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, युवक निरीक्षक सत्यजित सिसोदे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. अश्विनी जोशी आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कामाचा आढावा घेतला. आगामी विधानसभा निवडणुका नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार आहे, म्हणून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करावे. ‘गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा’, बूथनिहाय रचना तयार करून कमिटी गठित कराव्यात, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. प्रत्येक गावपाड्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करावे, असेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT