crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ग्रामपंचायत सदस्यास शिवीगाळ; 6 जणांवर ॲट्रॉसिटी दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सरपंचपदाच्या दावेदारीतून तालुक्यातील उत्राण गुजर हद्द गावात दोन गटात उफाळलेल्या वादातून संशयित अनिल महाजन यांच्यासह इतर पाच संशयितांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कासोदा पोलिस ठाण्यात तब्बल ४० दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.()

उत्राण गुजर हद्द गावातील गवंती चिमा पाडवी उर्फ कविता नितीन महाजन (वय ३०) या आदिवासी समाजाच्या ग्रामपंचायत सदस्या पीडित विवाहितेस पुढील सहा जणांनी घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात दिली.

तक्रारीत म्हटले आहे, की मी २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडूण आल्यानंतर आम्ही अपक्ष सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे सुरवातीचे अडीच वर्ष मनीषा वाघ यांना सरपंचपदासाठी व नंतरचे अडीच वर्ष मला सरपंचपद देण्याचे ठरले होते.

त्या नंतर सुद्धा श्रीमती वाघ यांनी त्यांचा कार्याकाळ पूर्ण झाल्यानंतर परत सरपंचपदासाठी अर्ज सादर करून पुन्हा निवडून आल्याने गावातील लोकांनी त्यांना व परिवर्तन पॅनलमधील ४ व अपक्ष ३ अशा सदस्यांना तुम्ही गद्दारी केली, तुम्ही शब्दाला टिकले नाहीत, असे बोलण्याचे संशयित ६ जणांना जिव्हारी लागले म्हणून २५ ऑक्टोबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास कविता महाजन व त्यांचे पती घरी असताना गावातीलच अनिल महाजन, योगेश महाजन, दिनेश सोनवणे, चंद्रकांत वाघ, हरेष पांडे, शरद वाघ (सर्व रा. उत्राण गु.ह., ता. एरंडोल) यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CET Exam 2026: ‘सीईटी’चे प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर,पाहा कोणत्या दिवशी कोणती परीक्षा?

लग्नाच्या काही तास आधी अपघात, मुहूर्त चुकू नये रुग्णालयातच लग्नाचा निर्णय; कसा पार पडला सोहळा? पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : माहिमधील शाही वाडी परिसरात आग, अग्नीशामकाच्या 4 गाड्या दाखल

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाच्या गालावर लागली सांगलीची हळद, फार्म हाऊसमधील लग्नाचे शाही व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं...

गडकरी साहेब पैसे पडून आहेत तर काम का होत नाही? नवले पुलावर स्थानिकांनी केला NHAIचा दशक्रियाविधी

SCROLL FOR NEXT