Jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : जुन्यावादातून 2 अल्पवयीन तरुणांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सागर पार्क मैदानासमोर मागील भांडणाच्या कारणावरून १७ वर्षीय मुलासह त्याच्या मित्रांना मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. शहरातील आदर्शनगरमध्ये रोनित अनिल अडवानी (वय १७) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे.

त्याचे एसटी वर्कशॉप परिसरातील कुणाल पवार व राहुल पवार या दोघा भावंडांसोबत पूर्वी भांडणे झाली होती. याच भांडणाचा वचपा काढण्यासाठी कुणाल व राहुल या दोघांनी रोनित व त्याच्या मित्राला चामडी पट्ट्याने मारहाण केली. (Attack on 2 minor youth from old quarrel Jalgaon Crime News)

यात रोनितच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे, तसेच ठार करण्याचीही धमकी दिली. या घटनेत रोनित व त्याचा मित्र जखमी झाला.

याबाबत रोनित याच्या तक्रारीवरून कुणाल पवार व राहुल पवार यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक चंद्रकांत पाटील अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

Maratha Reservation News : गणेशोत्सवात जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे

Sangameshwar News : २२ वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेला गावी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT