Crime Latest Marathi News esakal
जळगाव

अवैध वृक्षतोड प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला

टोळक्याने वन विभागाच्या पथकावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करून दगडफेक केली.

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : अवैध वृक्षतोडीतील संशयिताना पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर टोळक्याने येथील वन विभागाच्या पथकावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करून दगडफेक केली. या प्रकरणी १२ जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, आदी कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत येथील वन विभागाचे वनरक्षक कृष्णा पांडुरंग शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ ऑगस्टला वन विभागातील अवैध वृक्षतोडीतील संशयित कैलास वीरसिंग बारेला (रा. काळाडोह) यास अटक करून त्यास वन कोठडी असताना त्याने गुन्ह्यातील अन्य फरार संशयितांची नावे सांगितल्यानुसार त्या फरारी संशयितांना बुधवारी (ता.१७) सकाळी साडेपाचला येथील वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल रवींद्र तायडे, वनरक्षक प्रकाश बारेला, गोवर्धन डोंगरे, जीवन नागरमोजे, सारंग आढाळे यांच्यासह फिर्यादी शेळके हे सातपुड्यातील पेंझरीपाडा येथे संशयित रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, जामसिंग पखना बारेला, बिलालसिंग जामसिंग बारेला, प्यारसिंग रामसिंग बारेला, सखाराम जामसिंग बारेला, इना कमरू बारेला यांना पकडले असता त्यांचे नातेवाईक सीमा सखाराम बारेला, रसिका जामसिंग बारेला, मंजुराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरू बारेला ,व्यापारीबाई तुळशीराम बारेला यांनी पाठीमागून येऊन पथकावर लाथ्याकाठ्यांनी हल्ला करून दगडफेक केली.

या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात बारा संशयितांसह अज्ञात दहा ते पंधरा आरोपींविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT