जळगाव

शेतकऱ्याने उभारले स्वयंचलित हवामान मोजणी यंत्र

केऱ्हाळे येथील युवा शेतकरी अमोल पाटील यांचा यशस्वी प्रयोग, शेतात केळीसाठी राज्यात पहिल्यांदा वापर

दिलीप वैद्य

रावेर : तालुक्यातील केऱ्हाळा बुद्रुक येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील युवा केळी उत्पादक शेतकरी अमोल गणेश पाटील यांनी आपल्या शेतात सुमारे ८० हजार रुपये खर्च करून स्वयंचलित हवामान मोजणी यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करून घेतली आहे. या यंत्रणेचा वापर करून त्यांना पिकाच्या लागवडीपासून ते कापणीपर्यंतच्या विविध व्यवस्थेसाठी पाणी, खते, रोग, फवारणी यांचे व्यवस्थापन आणि हवामानाचा अंदाज कळणार आहे. केळी पिकासाठी अशा प्रकारचे वैयक्तिक खासगी हवामान मोजणी यंत्र संपूर्ण देशात प्रथमच केऱ्हाळे येथे बसविण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

शेतीत नवनवीन प्रयोग

केऱ्हाळा (ता. रावेर) येथील युवा शेतकरी अमोल पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करतात. केळीत झेंडू फुलांच्या लागवडीचा त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला होता. त्यांनी स्वतः केळीला पाणी देणारी संगणकीकृत स्वयंचलित यंत्रणा (ऑटोमेशन) विकसित केली आहे. त्यांनी आपल्या १६ एकर क्षेत्र असलेल्या केऱ्हाळे -पिंप्री रस्त्यावरील शेतात ही खासगी हवामान मोजणी यंत्रणा बसवून ती कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेचा वापर करून अमोल पाटील यांच्या मोबाईलवर विविध प्रकारची अद्ययावत माहिती दर ६ मिनिटाला मिळत राहते. यातून त्यांना आपल्या शेतातील पिकासाठी आवश्यक अशा उपयुक्त सूचना मिळत राहतात. शेतातील पिकासाठी आवश्यक अशा धोक्याच्या सूचना, रोगाचा संभाव्य अंदाज, सिंचन सल्ला, पिकांची काळजी आणि हवामानाचा अंदाज, पिकाच्या पानांमधील आर्द्रता, माती परीक्षण, हवेतील आर्द्रता, ढग, पाऊस, संभाव्य गारपीट, वाऱ्याचा वेग आणि दिशा या गोष्टींची माहिती या यंत्रणेद्वारे मिळत राहते.

केळीसाठी विशेष मार्गदर्शन

केळी हे जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्यातील प्रमुख पीक असल्याने या यंत्रणेत केळीसाठी विशेष प्रकारची यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यातून केळी पिकाला किती पाणी द्यायचे, खते केव्हा आणि कशी द्यायची याचीही माहिती मिळते. केळीवर करावयाच्या आवश्यक त्या फवारण्याबाबतही यंत्रणा सूचना देते. यामुळे शेतीला अनावश्यक खते आणि पाणी न दिले गेल्यामुळे जमिनीचा सामू (पीएच व्हॅल्यू) नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे अमोल पाटील यांनी सांगितले. शेतातील वाऱ्यांची दिशा कळल्यामुळे फवारणी करणे सोपे जाते. विविध रोगांच्या संभाव्य आक्रमणाची माहिती जशी या यंत्रणेवर दिली जाते तसे त्या रोगांवरचे उपाय देखील यावर सुचवले जातात. वादळ, पाऊस, ऊन, थंडी यांची आधीच पूर्वसूचना मिळाल्याने पुढील कामाचे नियोजन करणे सोपे जाते.

सध्या अमोल पाटील यांच्या या १६ एकर क्षेत्रात ६ एकर केळी, ६ एकर हळद आणि ४ एकर कलिंगड अशी लागवड केलेली आहे. या व्यक्तिगत आणि खासगी हवामान यंत्रणेमुळे तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात एक नवीन प्रयोग अमोल पाटील यांनी यशस्वी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT