Fraud esakal
जळगाव

Jalgaon Crime: 2 योजनांचा लाभ घेणे आले अंगलट! पिंपळगाव हरेश्वरला दाम्पत्याकडून वसुलीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाच्या एकापेक्षा अनेक योजनांचा लाभ घेणे बेकायदेशीर असून, कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येतो. मात्र, पिंपळगाव हरेश्वर येथील एका दाम्पत्याला दोन योजनांचा लाभ घेणे, चांगलेच अंगलट आले आहे.

पती-पत्नीने घेतलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी ४३ हजाराची वसुली का करण्यात येऊ नये, अशी नोटीस तहसीलदारांनी लाभार्थ्यांना पाठवली आहे. (Avail of 2 Schemes Pimpalgaon Hareshwar orders recovery from couple Jalgaon)

नीलेश नामदेव उभाले (रा. भोजे, ता. पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार देवराम हरी उभाळे व त्यांची पत्नी इंदुबाई देवराम उभाळे दोघे (रा. पिंपळगाव हरेश्र्वर, ता.पाचोरा) या पती-पत्नीच्या नावे श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत असताना त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचाही लाभ मिळत आहे.

तेव्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेंतर्गत २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येतो.

यामुळे तक्रारदार नीलेश उभाले यांच्या तक्रारीची चौकशी झाली असता देवराम उभाळे व इंदुबाई उभाळे यांनी दोन्ही योजनेचा लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे तहसीलदारांनी चौकशीअंती त्यांचा श्रावणबाळ योजनेचा लाभ रद्द करून त्यांच्याकडून प्रत्येकी ४३ हजार रुपये का वसूल करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठवली आहे.

यामुळे संबंधितांकडून दिलेली रक्कम वसूल करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे. या प्रकरणी नीलेश उभाले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करून या लाभार्थ्यांनी बेकायदेशीर शासनाची आर्थिक फसवणूक करीत भ्रष्टाचार केला आहे.

श्रावणबाळ योजनेचाही लाभ घेतला व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ही लाभ घेतला. दोन्ही लाभ घेत असल्याने त्यांनी शासनाची फसवणूक केली असून, श्रावण बाळ योजनेंतर्गत दिलेले मानधन रक्कमही तत्काळ वसुल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा मालमत्तेवर बोझा टाकावा, अशी मागणी केली असल्याचे नीलेश उभाले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT