स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरपाईसाठी तहसीलदारांना साकडे sakal
जळगाव

जळगाव : पीकविम्याच्या कार्यालयाला ठोकले टाळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरपाईसाठी तहसीलदारांना साकडे

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : तालुक्यातील पाचही मंडळात हजारो शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा काढला होता. यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व गुलाबी वादळामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आले. शेतात ओतलेला पैसा मातीमोल झाला. पर्यायाने पीकविम्याची रक्कम येईल. या आशेने शेतकरी होता. मात्र, शंभर टक्के नुकसान होऊन देखील विमा कंपनीकडून कपाशी पिकाला ४० हजार रुपये भरपाई मिळेल, असा उल्लेख असताना शेतकऱ्यांच्या खात्यात आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत, तेही तक्रारदार शेतकऱ्याला मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसान भरपाई सरसकट मिळावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. ६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहरातील उंदिरखेडा रोडलगत असलेल्या पीकविमा कंपनीच्या कार्यालयाला ताळे ठोकले तर शेळावे मंडळातील अतिवृष्टीचे अनुदान मिळावे, यासाठी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

या वेळी निवेदनात म्हटले आहे, की ज्या मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल, अशा मंडळातील शेतकऱ्यांना शासन सरसकट अनुदान देत असेल तर विमा कंपनी फक्त तक्रारदारालाच अनुदान देत आहे. शेतकरी हा मुळात अशिक्षित असतो, बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार देता आली नाही. जर नुकसान सरसकट शंभर टक्के झाले असेल तर विमा कंपनीने सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्‍टरी ४० हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे. मात्र, असे न झाल्याने शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर येऊन विमा कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ताळेठोक व तहसीलदारांना निवेदन दिले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील यांनी सांगितले.

शेळावेच्या अनुदानासाठी साकडे

शेळावे मंडळात अतिवृष्टी होऊन देखील अद्याप अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. मात्र, चोरवड आणि पारोळा मंडळाला अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे. याबाबत पाठपुरावा करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार अनिल गवांदे यांनी निवेदन दिले. २८ व २९ ऑगस्टला ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून सुद्धा शेळावे मंडळाला अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेळावे मंडळातील शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, पंकज पाटील, नामदेव पाटील, दिलीप पाटील, रणजित पाटील, विजय पाटील, शरद पाटील, भोजराज पाटील, सुभाष पाटील, पंढरीनाथ पाटील, लक्ष्मण पाटील, योगेश पाटील, शुभम पाटील, तुषार पाटील यांच्यासह दहीगाव, म्हसवे, ढोली, खेडी ढोक, हनुमंतखेडे, भोंडण येथील शेतकरी उपस्थित होते. पीकविम्याच्या भरपाईबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संबंधित विभागांशी संपर्क करण्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

SCROLL FOR NEXT