crime news  esakal
जळगाव

Jalgaon : रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराची ‘बच्चा गँग’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या अल्पवयीन साथीदारास चोरीच्या चार मोटार सायकलींसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यातील अल्पवयीनचा मास्टर माईंड गुन्हेगार फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. (Bacha Gang of staunch criminal on record Jalgaon latest crime news)

जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर भागातील रहिवासी तसेच पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकल चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खबऱ्यांकडून समजली होती.

चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकातील जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, भारत पाटील अशांच्या पथकाने हरिविठ्ठलनगरातून या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एकामागून एक अशा चार चोरीच्या मोटारसायकल काढून दिल्या आहे. त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहे.

बच्चा गॅंग सक्रिय

रेकॉर्डवरील गुन्हेगाराने परिसरातील अल्पवयीन मुलांना पैशांचे आमिष देत त्यांना चोरीच्या गुन्ह्यात ओढले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेला विधिसंघर्षीत अल्पवयीन मुलगा आयटीआयचे शिक्षण घेत असून त्याच्यासह इतरही अल्पवयीन मुल यात गुंतले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT