Bahinabai Chaudhari
Bahinabai Chaudhari esakal
जळगाव

Marathi Sahitya Sammelan : जळगावला रविवारी बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी राज्य साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील पवन फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (मुंबई) तर्फे रविवार (ता. ११ ) सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात एक दिवसीय १७ वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी राज्य साहित्य संमेलन होणार आहे. रविवारी सकाळी दहाला उद्घाटन होणार असून, आमदार सुरेश भोळे, संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे असतील.

विशेष आमंत्रित खासदार उन्मेष पाटील, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे धनंजय गुडसुरकर, पुष्पराज गावंडे, नाट्यछटाकार अरविंद नारखेडे ),कवी संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र दिघे असतील. (Bahinabai Sopandev Khandesh Marathi State Literature Conference in Jalgaon on sunday news)

कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी वा.ना.आंधळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, माजी नगरसेवक अमित काळे असतील.

साहित्यिका माया दिलीप धुप्पड स्वलिखित काव्यचित्र प्रदर्शन होईल. दुपारी मराठी भाषा अभिजाततेपासून दूर का आहे या विषयावर परिसंवाद होईल.

सायंकाळी समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.वासुदेव वले असतील. निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या नातसुना पद्माताई चौधरी व स्मिताताई चौधरी, निवृत्त प्राध्यापिका कमल पाटील.

सुनील इंगळे (डोंबिवली ), प्रा.संध्या महाजन,विशाखा देशमुख,साधना लोखंडे, पत्रकार तुषार वाघुळदे, कवी अशोक पारधे,शीतल पाटील, कवी संजय पाटील,किशोर नेवे उपस्थित राहतील.

कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून साहित्यिक व काव्य रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,व संमेलनाचे निमंत्रक डॉ.विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे.

कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे व विजय लुल्हे ,आयोजक रघुनाथ राणे व डॉ.संजय पाटील तसेच युवा विकास फाउंडेशनच्या कार्यकारिणी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT