Jalgaon: Nitin Laddha at the start of state level kabaddi tournament at Shivtirtha Maidan. Neighbors Sharad Taide, Jyoti Taide, Shubhangi Patil, Laxmikant Chaudhary, Raju Chaudhary, Ajay Jadhav, Narayan Khadke, Mangala Patil, Mayor Jayashree Mahajan, Sunil Mahajan etc esakal
जळगाव

Sports News : बाळासाहेब ठाकरे कबड्डी चषक स्पर्धेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हिंदूहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेला शनिवार (ता. २१)पासून प्रारंभ झाला.

शिवतीर्थ (जी. एस.) मैदानावर स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी नाशिक पदवीधर निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेविका ज्योती तायडे, लक्ष्मीकांत चौधरी, राजू चौधरी, अजय जाधव, नारायण खडके, मंगला पाटील, महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. (Balasaheb Thackeray Kabaddi Cup tournament begins three hundred players from state participated Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

उद्‌घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ललित धांडे, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, विमल माळी, प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी झालेले पुरुष संघ

स्पर्धेत पुरुष गटात महर्षी फाउंडेशन (जळगाव), ओम साई मंडळ (विखरण), शिवनेरी क्रीडा मंडळ (जळगाव), कैलास क्रीडा मंडळ (जळगाव), सर्वोदय क्रीडा मंडळ (जळगाव), हिंद केसरी क्रीडा मंडळ (धुळे), एनटीपीसी क्रीडा मंडळ (नंदुरबार), महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ (जळगाव), नेताजी सुभाष मंडळ (जळगाव), हनुमान व्यायामशाळा (जळगाव), जागृती क्रीडा मंडळ (बऱ्हाणपूर), क्रीडा रसिक मंडळ (जळगाव), स्वामी स्पोर्ट्स (रावेर), आर. सी. पटेल (शिरपूर), जय हिंद क्रीडा (धुळे) हे संघ सहभागी झाले आहेत.

सहभागी महिला संघ

महिला गटात जय मातृभूमी (भुसावळ), स्वामी स्पोर्ट्स (रावेर), मोरया क्रीडा (जळगाव), अष्टविनायक क्रीडा मंडळ (चोपडा), एकलव्य क्रीडा मंडळ (जळगाव), मुक्ताई युवा मंडळ (मुक्ताईनगर), आर. सी. पटेल क्रीडा मंडळ (शिरपूर), सरदारजी क्रीडा मंडळ (रावेर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT