जळगाव

बालगंधर्व महोत्सव यंदा चार दिवसांचा

द्विदशकपूर्ती वर्ष; ६ ते ९ जानेवारीदरम्यान आयोजन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : (कै). वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित बालगंधर्व संगीत महोत्सव यंदा ६ ते ९ जानेवारी असे चार दिवस रंगणार आहे. चार दिवसांच्या सात सत्रांत विविध नामवंत कलावंतांचे सादरीकरण होईल. यंदा महोत्सवाचे द्विदशकपूर्ती वर्ष असून, यानिमित्त निर्मित बोधचिन्हाचे अनावरण शुक्रवारी (ता. १०) करण्यात आले.

महोत्सवाच्या आयोजनाबाबत शुक्रवारी कांताई सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुळकर्णी यांनी माहिती दिली. खानदेशच नव्हे, तर राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रात मानदंड ठरलेल्या या महोत्सवाला जैन इरिगेशन, भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एलआयसी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, संस्कृती मंत्रालय, दिल्ली यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ६ जानेवारीस महोत्सवाचे उद्‌घाटन महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होईल.

यंदाचे आकर्षण

महोत्सवाच्या उद्‌घाटन सत्रात जळगावातील २५ ते ३० कलावंतांचे शिवतांडव स्त्रोत्र, पहिल्या सत्रात कथक, भरतनाट्यम्‌मधील जुगलबंदी, माऊथ ऑर्गन वादकाचे शास्त्रीय संगीत सादरीकरण, दुसऱ्या दिवशीचे सत्र ‘मर्मबंधातील ठेव ही’ या पूर्णत: नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रमाने रंगेल. तिसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये ध्रुपद गायन, तबला व पखवाज वादनाची जुगलबंदी रंगेल. चौथ्या दिवशी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन पहिल्या सत्रात होईल, तर महोत्सवाचा समारोप कोकण कन्या बँडच्या सर्व कलावंत महिलांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने होईल. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन अभिनेत्री तथा सुसंवादिनी दीप्ती भागवत करतील.

अद्याप स्थळ निश्‍चित नाही

द्विदशकपूर्ती वर्षानिमित्त यंदा प्रतिष्ठानतर्फे ‘सप्तसूर’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येत आहे. महोत्सवाचे स्थळ अद्याप निश्‍चित नाही. बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, ते पूर्ण झाले तर तेथेच महोत्सव होईल, अन्यथा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होईल. महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांना आधीन राहून होईल, असेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेनंतर महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण डॉ. कुळकर्णी, प्रा. शरच्चंद्र छापेकर, अरुण जोशी, श्री. आगरकर, मनोजकुमार, दीपक चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अपर्णा भट, दीपिका चांदोरकर आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : सासऱ्यांनी सुरू केलेल्या डिबेंचरविरोधात सुनेचा मोर्चा, ढोंगी माणसांना लोक ओळखून, हसन मुश्रीफांचा कोणावर रोख...

Minister Dattatreya Bharane: राज्यात रब्बी हंगाम क्षेत्रात होणार वाढ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; पाणी टंचाई जाणवणार नाही

Hingoli Diwali : फटाके उडवताना पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत; फुटलेला फटाका उडून डोळ्यातील बुब्बूळाला लागला अन्...

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT