bananas esakal
जळगाव

जिल्ह्यातील १४४ गावांना केळीची भरपाई

पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा, सलग ५ दिवस ४२ ते ४५ तापमानाचा निकष

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना २०२२-२३ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ‘केळी’ पिकासाठी जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रक्कमेस पात्र ठरणार आहे. जिल्ह्यातील १४४ महसूल मंडळांतील गावांना केळीची नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

यामध्ये १ ते ३० एप्रिल या कालावधीत सलग ५ दिवस ४२ सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे ८३ महसूल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसूल मंडळांना ३५ हजार प्रतिहेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. १ ते ३१ मे या कालावधीत सलग ५ दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे ६१ महसूल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसूल मंडळांना ४३ हजार पाचशे प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल.

एप्रिल व मेमध्ये जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसूल मंडळांना जास्तीत जास्त ४३ हजार पाचशे प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय कृषी विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे.

महसूल मंडळानिहाय गावे अशी :

जळगाव- म्हसावद, भोकर, पिंप्राळा, असोदा. भुसावळ- कुऱ्हे प्र.न, वरणगाव, पिंपळगाव खुर्द, बोदवड- नाडगाव, यावल- भालोद, बामणोद, फैजपूर, साकळी किनगाव बुद्रूक, रावेर- खानापूर, खिरोदा प्र.चा, निंभोरा बुदु्क, खिर्डी, ऐनपूर. मुक्ताईनगर- अंतुर्ली, घोडसगाव, अमळनेर- शिरुड, नगाव, पातोंडा अमळगाव, मारवड, भरवस, वावडे. चोपडा- हातेड बु, लासुर, अडावद, धानोरा प्र.अ, गोरगावले बुद्रूक, चहार्डी, एरंडोल- रिंगणगाव, कासोदा, उत्राण, धरणगाव- साळवा, सोनवद, पिंप्री बुद्रूक, पाळधी, चांदसर, पारोळा- शेळावे, तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव- मेहुणबार. जामनेर- नेरी, पहुर, पाचोरा-गाळण, नांद्रा, कुऱ्हाड बुद्रूक. भडगाव- कोळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT