जळगाव

केळी निर्यात जोमात; ट्रकने ओलांडला २०० चा टप्पा

दिलीप वैद्य

रावेर  : सध्या उत्तर भारतात केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने जिल्ह्यातून पूर्ण क्षमतेने केळी कापणी आणि वाहतूक होत आहे. तालुक्यातून केळी वाहतूक होणाऱ्या ट्रकने २०० चा आकडा ओलांडला आहे तर रेल्वे वॅगन्सद्वारेही वाहतूक सुरू आहे. रावेर तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. सध्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर केळी कापणी होऊन उत्तर भारतात दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आदी भागात पाठविली जात आहे. 

मार्चच्या अखेरीस तालुक्यातून सुमारे १२५ ट्रक भरून केळी पाठविली जात होती. मात्र १ एप्रिलपासून त्यात मोठी वाढ झाली आहे. १ एप्रिल- १३० ट्रक, ३ एप्रिल- १८४ ट्रक, ५ एप्रिल- १७४ ट्रक, ६ एप्रिल- १८५ ट्रक आणि ७ एप्रिल- २०८ ट्रक अशी वाढ होत गेली आहे. तालुक्यातून ट्रकद्वारे किमान २२ हजार टन केळी वाहतूक होते. 

रेल्वेद्वारे आठवड्यात ३८०० टन 
तब्बल ७ वर्षांनंतर तालुक्यातील सावदा आणि रावेर रेल्वे स्थानकावरून केळी वाहतूक सुरू झाली आहे. सावदा रेल्वेस्थानकावरून बीसीएन प्रकारच्या पारंपरिक वॅगन्समधून आठवड्यातून तीनदा (सुमारे २७०० टन), व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्समधून दोनदा (सुमारे ६५० टन) व सावदा आणि रावेर रेल्वेस्थानकावरून आठवड्यातून दोनदा व्हीपीयूएसआर प्रकारच्या वॅगन्समधून (सुमारे ५०० टन) केळी वाहतूक सुरू आहे. अशा प्रकारे रेल्वेद्वारे आठवड्यात ३८०० ते ४ हजार टन केळी वाहतूक होत आहे. 


नवरात्र, रमजानमुळे मागणी वाढली 
नवरात्र उत्सव आणि रमजान महिना आहे, तोपर्यंत केळीला मोठी मागणी असून, केळी मजुरांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT