crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावजवळ पिस्तूलचा धाक दाखवून बॅंक मॅनेजरला लुटले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन लिपीकासोबत जाणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला पिस्तूलचा धाक दाखवून दोघा अनोळखींनी पंधरा हजार रुपये असलेली बॅग लुटून नेल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन लिपीकासोबत जाणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला पिस्तूलचा धाक दाखवून दोघा अनोळखींनी पंधरा हजार रुपये असलेली बॅग लुटून नेल्याची घटना घडली. लूट करणाऱ्यांनी लिपीकाच्या पायावर व हातावर लोखंडी रॉड मारुन ते पसार झाले.

याबाबत माहिती अशी, गणेशपूर (ता. चाळीसगाव) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शाखाधिकारी किसन भवर व लिपीक महेश पाटील हे शुक्रवारी (ता. ९) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चाळीसगाववरुन दुचाकीने गणेशपूर शाखेत जात होते. (bank manager was robbed at gunpoint near Chalisgaon jalgaon crime news)

खडकी बुद्रूक गावाजवळ पुलाचे काम सुरू असल्याने डायवर्ड रस्त्यावरील निर्जनस्थळी समोरून तोंडाला पट्टी बांधलेले दोघे दुचाकीवरुन आले. त्यांनी भवर यांची दुचाकी थांबवून त्यांना छोट्या आकाराची पिस्तूल लावली व त्यांच्याजवळील पैशांची बॅग काढून घेतली.

दुचाकीवरुन जाताना दोघांपैकी एकाने लिपीक महेश पाटील यांच्या पायाला व हातावर लोखंडी रॉड मारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे किसन भवर व लिपीक पाटील यांना काहीच समजले नाही.

कसेबसे सावरल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत लुटमारीची घटना पोलिसांना सांगितली. महेश पाटील यांना मार लागल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. शाखाधिकारी किसन भवर हे सात- आठ वर्षांपासून जिल्हा बँकेच्या गणेशपूर शाखेत दररोज दुचाकीने ये-जा करतात.

त्यामुळे त्यांच्याकडे बँकेची रोकड असेल या हेतूने चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुदैवाने शाखा व्यवस्थापक श्री. भवर यांच्याकडे केवळ १५ हजारांची रोकड होती. याशिवाय बँकेची काही कागदपत्रे व चाव्या होत्या. या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ नाकाबंदी केली. दरम्यान, पैसे लुटणाऱ्यांकडे असलेले पिस्तूल वर्णनावरुन नकली असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT