kite flying esakal
जळगाव

Jalgaon News : पतंग उडविताना खबरदारी घ्या!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मजा लुटतात.

मात्र, पतंग उडविताना पतंग, मांजा वीजखांब, रोहित्रे, वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविताना वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. (Be careful while flying kites avoid use of metal alloy Instruction of Mahavitaran Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

शहरी व ग्रामीण भागात वीज वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरले आहे. मात्र, पतंग उडविताना या यंत्रणेपासून दूर राहावे. पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा. वीजवाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. कारण वीजवाहिन्यांच्या एकमेकांवर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते.

वीजतारांमधील पतंग काढणे टाळा

घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातूमिश्रित मांजाचा वापर टाळावा. कारण धातूमिश्रित मांजा वीज यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात वीज प्रवाहित होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT