crowd to get income certificate esakal
जळगाव

जळगाव : उत्पन्न दाखल्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : जीवन चव्हाण
चाळीसगाव (जि. जळगाव) :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची (Income Certificate) सक्ती केल्यानंतर दाखला काढण्यासाठी येथील तहसील कार्यालयात झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. तासंतास ज्येष्ठांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून एका कागदासाठी तलाठ्यांकडे अनेक फेरफटका मारावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थी आता हतबल झाले आहे. ही जाचक अट तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. (Beneficiarys tired to get income Certificate Jalgaon News)

तालुक्याला संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा व इंदिरा गांधी निराधार योजना आदी वरदान ठरलेल्या आहे. या योजनेच्या विशेष साहाय्य निधीतून हजारो लोकांच्या घरात चुली पेटत आहे. दरम्यान, तालुक्यात एकूण ३१ हजार २०० लाभार्थी वरील योजनांचे लाभ घेत आहे. त्यापैकी संजय गांधी निराधारचे ५ हजार पाचशे, श्रावणबाळ सेवा योजनाचे ८ हजार सातशे व इंदरा गांधी निराधारांचे १७ हजार लाभार्थी आहे. दरम्यान सामान्य न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्याकडील २० ऑगस्ट २०२० रोजीच्या शासननिर्णयानुसार विशेष साहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर एप्रिल-जून महिन्यांत २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातील संगायो शाखेत जमा करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

तसेच या कालावधीत लाभार्थींनी उत्पन्नाचा दाखला जमा न केल्यास जुलै महिन्यांपासून अर्थसाहाय्य बंद करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहे. त्यानंतर एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, दाखला जमा करण्याची ३० जून शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपली महिन्याचे पगार बंद होतील म्हणून ग्रामीण भागातील ज्येष्ठ लाभार्थी धास्तावले आहे. व एकेक कागदासाठी त्यांना तलाठी व तहसील कार्यालयाचा अनेकवेळा पायपीट करावी लागत आहे. यामुळे ज्येष्ठ लाभार्थी त्रस्त झाले आहे. तातडीने ही जाचक अट रद्द करण्याची मागणी लाभार्थांमधून केली जात आहे.

"गेल्या दोन दिवसांपासून एका कागदासाठी तलाठ्याकडे चकरा मारत आहे. त्या एका कागदासाठी मला ४० रूपये मोजावे लागले. त्यानंतर सकाळपासून दुपारपर्यंत कागद जमा करण्यासाठी रांगेत उभा आहे. हा नवीन नियम लागू करून शासनाने गोरगरीबांची थट्टाच केली आहे." - गंगाराम लोटन धनगर, लाभार्थी (रा. खडकी, ब्रु. ता. चाळीसगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT