documentry sakal
जळगाव

‘अ’ लघुपट, ‘मॅन इन मँचेस्टरला उत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा 'किताब

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल; दोन दिवसीय महोत्सवाचा समारोप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील स्मिता पाटील चित्रनगरीत आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये(devgiri short film festival) ‘अ’ ही शॉर्टफिल्म तर ‘मॅन इन मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र’ ही (‘Man in Manchester of Maharashtra’)डॉक्युमेंट्री उत्कृष्ट ठरली.बेंडाळे महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटीच्या विद्यमाने दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचा आज समारोप झाला. यात अनेक लघुपटांमधून ज्वलंत विषय मांडण्यात आले.

‘अ’ ह्या उत्कृष्ट ठरलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी करावा लागणार संघर्ष, आई वडिलांचे भांडण , शिक्षणातही स्त्री-पुरुष भेदाभेद ह्या शॉर्ट फिल्म मध्ये भावनाशील आणि प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.उत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेल्या ‘तासिका’ फिल्म साठी शेख अस्लम युनूस यांना देण्यात आला. या फिल्ममध्ये तासिकावर काम करणाऱ्या शिक्षकांची भयाण अवस्था आणि शिक्षण व्यवस्थेचे वास्तव यात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

पारितोषिक वितरण लेखक दिग्दर्शक व आयफा ज्युरी आकाशादित्य लामा , प्राचार्य डॉ. गौरी राणे, प्रमोद बापट, डॉ. जयंत शवतेकर, स्वानंद झारे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात खानदेश, मराठवाडासह महाराष्ट्रातून ६० शॉर्ट फिल्मच्या एन्ट्री आल्या होत्या. लघुपट, डॉक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, अ‍ॅनिमेशन फिल्म या चार विभागांत चित्रपट मागविण्यात आले होते. महोत्सवात स्थानिक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक इत्यादींसाठी प्रा. सोमण व ‘आयफा’चे ज्युरी मेंबर तथा सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते आकाशादित्य लामा यांच्या कार्यशाळाही घेण्यात येत आहेत. सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केले. आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले.

‘मॅन इन..’चाही डंका

उत्कृष्ट माहितीपट (documentry) रोहित चव्हाण यांच्या ‘मॅन ईन मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र’ एकेकाळी भारताचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजी(Ichalkaranji) येथील सूतगिरणी कारखान्याची आणि कामगारांची व्यथा मांडण्यात आली आहे.

महोत्सवाचा निकाल असा

  1. सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म : ‘अ....’ शंकर यशोद (दिग्दर्शक), सुनील अहिरे (निर्माता)

  2. उत्कृष्ट माहितीपट : (डाक्युमेंट्री) : मॅन ईन मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र, रोहित चव्हाण (दिग्दर्शक)

  3. उत्कृष्ट अनिमेशन : अब्रू (पवन पाटील, एम.जी. महाविद्यालय चोपडा)

  4. उत्कृष्ट पटकथा : कविता (अमर मारुती)

  5. उत्कृष्ट दिग्दर्शक : शेख अस्लम युनूस (‘तासिका’साठी)

  6. उत्कृष्ट बाल कलाकार : आर्यन पाटील

  7. उत्कृष्ट अभिनेता : जगदीश जाधव (तासिका)

  8. उत्कृष्ट अभिनेत्री : वैशाली दाभाडे (अ...)

    (devgiri short film festival )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT