Abhijeet Raut Sakal
जळगाव

जळगाव : बोगस बियाण्यांबाबत सतर्क राहा : जिल्हाधिकारी राऊत

कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - जिल्ह्यात बोगस बियाणे येता कामा नये. आले तर शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होईल. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचा शोध घ्या. सतर्क राहून बोगस बियाण्याची विक्री होऊ देऊ नका. विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी (ता. २७) दिल्या. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा झाली. त्यावेळी ते सूचना देत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषेदेच कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, मोहीम अधिकारी विजय पवार, खते बियाणे कीटकनाशके विक्रेते कंपनी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. राऊत यांनी कंपनी प्रतिनिधींना बियाण्यांचा पुरवठा वेळेत करण्यास सांगून शेतकऱ्यांनी मिश्रखत घरी तयार करण्याचा सल्ला दिला. यावेळी बियाणे खते किटक नाशके खरेदी करताना घ्यायची काळजी व जिवाणू खते वापर व फायदे याबाबत बॅनरचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील उपलब्ध खत साठा सहज समजावा यासाठी तालुकानिहाय ब्लॉगस्पॉट उपलब्ध करून दिला आहे. त्याचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी शिंदे यांनी केले. आभार कृषी उपसंचालक भोकरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT