crime
crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पैसे पडल्याचे सांगून भामट्याने लांबविला कार मधील लॅपटॉप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : कारवरील चालकाला अहो...तुमचे पैसे खाली पडल्याचे सांगत, चालकाचे लक्ष विचलित होताच सेकंदात कारच्या सिटवरील लॅपटॉप लंपास झाला.

लहान मुलाच्या मदतीने चोरट्याच्या टोळीने भरगच्च गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या दाणाबाजारात सर्वांदेखत लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी एका ड्रायफ्रुट दुकाना समोर घडली. (Bhamtya extended laptop in car saying that money has fallen jalgaon crime news)

दाणा बाजारात सह व्यावसायिक मित्राने नवीन दुकान सुरू केले म्हणून जाऊन भेट घ्यावी सदिच्छा द्याव्या यासाठी दर्शन ईश्वर चोरडिया (२४, रा. नवीन बसस्थानक जवळ) त्यांना भेटण्यासाठी कार घेवुन तेथे आले होते. ड्रायव्हरने कार थांबवल्यावर लॅपटॉप तसाच पुढच्या सिटवर ठवुन चोरडीया खाली उतरले.

कारवर नजर असलेल्या भामट्यांनी कार हेरली. कारजवळ तीन जण आले..त्यापैकी एकाने बसस्थानक कोठे आहे, अशी विचारणा ड्रायव्हरला केली. त्याने पत्ता सांगितला तितक्यात एकाने अहो..तुमचे पैसे खाली पडले असे चालकाला(ड्रायव्हरला) सांगितले. पैसे पडले..ते बघण्यासाठी चालक खाली पहायला उतरला आणि दुसऱ्या बाजूने एका लहान मुलाने कारचा दरवाजा उघडून लॅपटॉपची बॅग लांबविली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर चालक व चोरडिया यांनी परिसरात शोध घेतला. मात्र चोरटे सापडले नाही. त्यामुळे त्यांनी शनिवारी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बशीर तडवी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT