Girish Mahajan  esakal
जळगाव

भाजपचा तिसरा उमेदवार विजयी होणारच : गिरीश महाजन

मिलिंद वानखेडे

जळगाव : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव समोर दिसत असल्याने ते बिथरले आहेत. त्यामुळे त्यांची हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे. आमची रणनीती पक्की झाली असून, कोणत्याही परिस्थितीत आमचे धनंजय महाडीक विजयी होणारच, हे आपण खात्रीशीर सांगत आहोत, असे भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने तिघांवर सोपविली आहे. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश आहे. यासाठी महाजन यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लहान पक्ष व काही अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत, आमच्याकडे तिसरा उमेदवार जिंकण्याइतके पुरेसे संख्याबळ आहे.

त्यामुळे आपण छातीठोकपणे सांगू शकतो की आमचा तिसरा उमेदवार विजयी होणारच. शिवसेनेचे आमदारच त्यांच्यावर नाराज आहेत. ते आता जाहीरपणे मंत्री टक्केवारी घेत असल्याची टीका करीत आहेत, घटक पक्षातील बच्चू कडू, अबू आझमी नाराज आहे. त्या मुळे आता महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसत आहे. त्यासाठी आता हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे. त्यांना आता आपल्याच आमदारांवर भरोसा राहिलेला नाही. आमचा विजय निश्चित असून, राज्यांतील बदलाची ही नांदी असेल, असा आपला ठाम विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT