Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : न्हावे येथील भवानी मातेच्या मंदिरातून पितळी घंटा लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : न्हावे (ता. चाळीसगाव) येथील पातोंडा रस्त्यावरील भवानी मातेच्या मंदिरातून सुमारे ३० ते ३५ किलो वजनाची पितळाची घंटा व सुमारे अडीच ते तीन फूट उंचीची सम‌ई चोरट्यांनी सोमवारी (ता. १२) रात्री लंपास केली.

चोरट्यांनी बंद घरांना सावज केल्यानंतर आपला मोर्चा मंदिराकडे वळविला आहे. न्हावे गावाजवळील पातोंडा रस्त्याला असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. (Bhavani Mate from Nhava brass bell for temple Theft by thieves Jalgaon News)

सध्या खरीप शेतीची लगबग सुरू असून, सर्व शेतकरी कुटुंब दिवसभर कामानिमित्त शेतात राबतात व रात्री गाढ झोपेत असतात.

चोरट्यांनी अशा प्रकारे गावात मोर्चा वळवला तर शेतीसाठी आणून ठेवलेला घरातील पैसा चोरीला जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

या संदर्भात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे, या मंदिरातील चोरी झालेल्या पितळी घंटा व तीन फुटाची समई कोणत्याही दुकानावर मोड म्हणून विकत असताना चोरट्यांवर नजर ठेवून पोलिसांना चोर पकडण्यात यश येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT