Bhusawal hawkers zone question meetings for traffic issue esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळला ‘हॉकर्स झोन’ प्रश्‍न बैठकांचा सपाटा; प्रशासकांनी जाणून घेतल्या समस्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील वाहतूक कोंडीसह अतिक्रमणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पालिकेने ॲक्शन प्लॅन आखला असून, वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार केले आहेत. यामध्ये भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते तसेच हातगाडी लावणारे व्यापाऱ्यांना त्या झोनमध्ये हलविण्यासाठी बुधवारी (ता.२२) उपविभागीय अधिकारी तथा पालिका प्रशासकांनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली.

यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.(Bhusawal hawkers zone question meetings for traffic issue jalgaon news)

शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त झालेले फळविक्रेते, भाजीविक्रेते तसेच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करणारे व्यापारी आता कुठे झालेल्या नुकसानाच्या सावटातून बाहेर येताच नगरपालिकेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती व नेहरू मैदान येथे हलविण्याबाबत बुधवारी (ता.२२) दुपारी चारला प्रांत कार्यलयात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

शहराचा विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी विविध योजनांचा ॲक्शन प्लॅन तयार करून प्रशासकीय काळात भुसावळ शहराचा चेहरा बदलविण्याचे काम हाती घेतले आहे. या विकासकामामध्ये कुठलाही पुढारी हस्तक्षेप करणार नाही, याबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी प्रयोजन केले आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भुसावळ शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे.त्याचप्रमाणे प्रशासकांनी शहरातील गंभीर प्रश्‍न असलेला अतिक्रमणाचा हाच मुद्दा हाती घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार केले आहे.

यामध्ये भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते तसेच हातगाडी लावणारे व्यापाऱ्यांना त्या झोनमध्ये हलविण्यासाठी बुधवारी (ता.२२) उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेऊन त्याच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेणेकरून नेहरू मैदान येथे व्यापाऱ्यांना हलविण्यात आले तर याठिकाणी व्यापारी आपल्या हातगाड्या हक्काने लावू शकतील, तसेच पालिकेकडून पाणी, वीज, शौचालय व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

व्यापाऱ्यांचे प्रशासकांना साकडे

भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी उमेश नेमाडे असताना शहरातील नाल्यांवर सिमेंट काँक्रिटीकरण करून हातगाडी व्यापाऱ्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मात्र घोड कुठे अडले. यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित पडून होता. गेले कित्येक वर्षांपासून हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक पुढाऱ्यांनी प्रयत्न केला.

मात्र शेवटी त्याच्या हाती अपयशच आहे. जोपर्यंत व्यापाऱ्यांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलू नये, अशी विनंती व्यापारी वर्गाकडून प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना करण्यात आली.

वाहतूक कोंडी सुटणार

पालिका हातगाड्या लावण्यासाठी व्यवस्था करून देणार असून, यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल. तसेच रोजगार वाढून प्रशासनाच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. तसेच वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. सद्यस्थितीला ठोक व्यापाऱ्यांचा लिलाव बेकायदेशीर पणे सुरू आहे. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला साथ दिल्यास आपला बेकायदेशीर व्यापार कायदेशीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT