Patholes esakal
जळगाव

जळगाव : शिवाजीनगरात रस्त्यातील व्हॉल्व्हमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

शिवाजीनगरात भररस्त्यात पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा मोठा खड्डा झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवाजीनगरात भररस्त्यात पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा मोठा खड्डा झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरिक जीव धोक्यात घालून वाहन चालवित आहेत. (Latest Marathi News)

शिवाजीनगर, तसेच हुडको भागात पाणीपुरवठ्यासाठी कानळदा रोड कॉर्नरच्या रस्त्यावर ‘व्हॉल्व्ह’ करण्यात आला आहे. या व्हॉल्व्हचा खड्डा ऐवढा मोठा झाला आहे, की त्यात वाहनास अपघात होत आहेत. या खड्ड्यात मंगळवारी (ता. १६) एकाचे पुढचे चाक अडकले होते. सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही. नागरिकांच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी या व्हॉल्व्हच्या खड्ड्यात पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी त्याच्या अवतीभवती मोठे दगड ठेवले आहेत.

पाणीपुरवठ्याचा हा व्हॉल्व्ह रस्त्यातून दुसऱ्या जागेवर करावा, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. भररस्त्यात हा व्हॉल्व्ह असल्यमुळे तो धोकादायक झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून हा व्हॉल्व्हचा खड्डा भरावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तक्रारही नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT