Moreshwar Lotu Attarde esakal
जळगाव

Jalgaon Accident News : धरणगावजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : धरणगाव शहराजवळ भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत गुरुवारी (ता. ३०) सकाळी दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

मोरेश्वर लोटू अत्तरदे (वय ५०, रा. साळवा, ता. धरणगाव) असे मृताचे नाव आहे. (Bike rider dead in collision with Eicher near Dharangaon jalgaon accident news)

मृतदेह जळगावला आणल्यानंतर नातेवाइकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. अत्तरदे पाच दिवसांपासून नातेवाइकांकडे मुंबईला गेले होते. गुरुवारी सकाळी ते मुंबईहून धरणगावला आले होते.

काम आटोपल्यानंतर धरणगाव येथून त्यांच्या दुचाकीने ते गावी निघाले. धरणगावच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ चोपडाकडून धरणगावकडे येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर साळवा गावातील नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात मुख्यमंत्री, संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी साप; उपस्थितांचा उडाला गोंधळ

Virat Kohli Cryptic Post: खरा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा...; विराटच्या पोस्टने सारे चक्रावले, गौतम गंभीरच्या 'त्या' सूचक इशाऱ्याला दिले उत्तर

Doctor Case : धक्कादायक! लग्नानंतर चार महिन्यांतच डॉक्टरने पत्नीला इंजेक्शन देऊन मारले ठार; दोघांत असं काय घडलं?

Veterinary Doctor: पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे? जाणून घ्या अभ्यासक्रम अन् किती पगार मिळतो

Dhanteras 2025 Wishes In Marathi: धन धान्याची व्हावी घरीदारी रास..! धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक अन् मित्रमंडळींना द्या खास मराठीतून शुभेच्छा

SCROLL FOR NEXT