accident esakal
जळगाव

Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे : रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अज्ञात वाहनाने त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीसही धडक दिली. त्यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील पिलखोडजवळ घडली.(Bike rider killed on the spot by accident jalgaon latest news)

शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र राजाराम कोळी (वय ४०, ह.मु. खुलताबाद, जि. औरंगाबाद) हे दुचाकीने (एमएच २०, ईएन ७०५४) जात असताना शुक्रवारी (ता.३०) रात्री नऊच्या सुमारास चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर पिलखोडजवळ हॉटेल रणांगणाच्या पुढे पाटचारीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की त्यात रवींद्र कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचवेळी या अज्ञात वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या एका बैलगाडीला देखील धडक दिली.

त्यात एक बैल जागीच मृत्युमुखी पडला. या अपघातप्रकरणी सतीश कोळी (रा. शिरसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार मोहन सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT