

Tata Sons Boardroom Tussle N Chandrasekaran Continues at the Helm as Noel Tata Remains Unhappy With Leadership Move
sakal
मुंबई : ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाने आजच्या बैठकीमध्ये एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याच्या बाजूने कौल दिला. मात्र, समूहाचे बहुतांश भागभांडवल असलेल्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी या फेरनियुक्तीच्या विरोधात मतदान केले.