जळगाव

भाजपचे विजबिलाविरोधात टाळाठोको आंदोलन; वीज वितरण कार्यालयास लावले कुलूप 

अल्हाद जोशी

एरंडोल : लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात भाजपतर्फे वीज वितरण कार्यालयावर टाळाठोको आंदोलन करण्यात आले.आघाडी सरकारने वीज बिल माफीची घोषणा करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजपतर्फे शांतारामदादा चौकापासून वीज वितरण कार्यालयापर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असून अनेकांचे रोजगार बुडाले असल्याचे सांगितले. कोरोना काळातील विजेचे बिल माफ करण्याची घोषणा आघाडी सरकारने केली होती.मात्र वीज बिल माफ करण्याएवजी वितरण कंपनीने वाढीव बिले आकारून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

विज मंडळाच्या कार्यालयाला टाळे लावले

नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी आघाडी सरकार वीज बिलाबाबत दुटप्पी भूमिका घेत असून वीज ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.यावेळी भाजप पदाधिका-यांनी वीज मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाबाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले.

घोषणा देवून आघाडी सरकारचा निषेध

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणा देऊन आघाडी सरकारचा व उर्जा मंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.आंदोलनात तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,नगराध्यक्ष रमेश परदेशी,जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक सचिन पानपाटील,भाजप ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी,शहराध्यक्ष निलेश परदेशी, भाजप युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन, शहराध्यक्ष आबा चौधरी,नगरसेवक जहिरोद्दिन शेख कासम, नितीन महाजन,अकिल शेख,सुभाष पाटील, लोकेश महाले, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT