MLA Kishore Patil, Raosaheb Patil, Ganesh Patil, Sunil Patil, Praveen Brahmin etc. esakal
जळगाव

Shiv Sena News: गाळण येथील भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा

Shiv Sena News : गाळण (ता. पाचोरा) भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील यांच्यासह बहुसंख्य तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. (BJP yuva morcha office bearers activists join in Shiv Sena from Galan)

आमदार किशोर पाटील यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विठ्ठल मंदिरात रविवारी रात्री प्रवेश सोहळा झाला.

या वेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीच सभापती गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे, डॉ. बी. बी. राजपूत, ॲड. दीपक बोरसे पाटील, माजी सभापती अनिल पाटील, उपसरपंच ईश्वर पाटील, सरपंच आत्माराम राठोड, माजी सरपंच राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी रावसाहेब पाटील, सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार किशोर पाटील यांनी गाळण बुद्रुक, गाळण खुर्द, हनुमानवाडी, विष्णुनगर आदी भागात केलेल्या विकासकामांची माहिती देत पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

नितीन राजपूत यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ॲड. दीपक बोरसे पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT