Sumit Nhavi Found dead latest marathi news esakal
जळगाव

13 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला; पंधरा फूट खोल खाणीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) येथील तेरा वर्षीय बालक शुक्रवार(ता. १५)पासून बेपत्ता झाला होता. एमआयडीसी पोलिसांत त्याच्या हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

शनिवारी (ता. १६) गावापलीकडे उजाड कुसुंबा भागातील खोल खाणीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. (Body of 13 year old boy found Died by drowning in 15 feet deep mine jalgaon latest Marathi news)

रविवारी दुपारी उजाड कुसुंबा भागातील खाणीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस पाटील राधेशाम चौधरी यांनी कळवल्यानुसार एमआयडीसी पोलिस घटनास्थळावर दाखल झाले.

मृतदेह बाहेर काढल्यावर तो बेपत्ता सुमीत योगेश्वर न्हावी (वय १३) याचा असल्याची ओळख पटल्यावर कुटुंबीयांना कळवण्यात आले. कुटुंबीयांनी सुमितचा मृतदेह पाहताच एकच आक्रोश केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर संध्याकाळी शवविच्छेदन करून कुटुंबीयांना सोपवण्यात आला. सुमीत हा मानसिक ताण-तणावात असल्याने यापूर्वीही तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Workers Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; अग्रीम म्हणून 'इतकी' रक्कम मिळणार

MBBS Doctor : केवळ २५ हजारांच्‍या वेतनावर एमबीबीएस डॉक्टर काम करण्‍यास तयार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांना रोखण्यासाठी माझी लढाई

Nagpur Crime : सहा महिन्यांपासून चिंतेत, ती करतेय ‘ब्लॅकमेल’; युवकाच्या आत्महत्येचा पत्रातून खुलासा, युवतीवर गुन्हा दाखल

खुशखबर! बुधवारपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला; 356 किलोमीटरवरील मुंबईत जाता येणार अवघ्या 2 तासात

SCROLL FOR NEXT