death esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ढालसिंगीत वीटभट्टी मजुराचा मालकाकडून मारहाणीत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर (जि. जळगाव) : येथून जवळच गोद्री येथील वीटभट्टी मजुराचा मालकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १५) सायंकाळी घडली. या प्रकरणी वीटभट्टी मालकाविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Brick laborer beaten to death by boss in Dhalsingi Jalgaon Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

जामनेर तालुक्यातील तोंडापूर- ढालसिंगी रस्त्यावर हर्षल भरत पवार यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर गोद्री येथील लहानू चांदखॉ तडवी हा कुटुंबासह मजुरी करीत होता. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लहानू तडवी व पत्नी सोनी यांच्यात झालेले वाद सोडविण्यासाठी मालक हर्षल पवार गेले होते. या वेळी लहानू तडवी यास वाद बंद करण्याची सूचना करूनही एकत नसल्याचे पाहून हर्षल पवार यांनी लहानू तडवी यास काठीने मारहाण केली.

यात मेंदूला दुखापत झाली असता या वेळी लहानू तडवी यास तातडीने तोंडापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. यानंतर वीटभट्टी मालक हर्षल पवार यांनी लहानू तडवी यांचा मृतदेह वीटभट्टीवर आणून ठेवला. मृत लहानू तडवी यांचे काका शाहरुख रशीद तडवी यांना या प्रकरणी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांच्यासह नातेवाइकांनी लहानू तडवी याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला.

यावरून पहूर पोलिसांनी वीटभट्टी मालक हर्षल पवार याच्याविरुद्ध लहानू तडवी याचे काका शाहरुख राशिद तडवी यांच्या फिर्यादीवरून खून केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT