भावेश महाजन Sakal
जळगाव

विवाहाच्या पाच दिवसांपूर्वीच नवरदेवाचा विहिरीत पडून मृत्यू

वराच्या अचानक मृत्यूमुळे परिवारात शोककळा पसरली आहे

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल - विवाहाला केवळ पाच दिवस शिल्लक असताना, २५ वर्षीय नवरदेवाचा बुधवारी (ता. २०) सकाळी नऊच्या सुमारास शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. वराच्या अचानक मृत्यूमुळे परिवारासह मित्रमंडळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश महाजन याचा विवाह २५ एप्रिलला होणार होता. मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन व त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते. विवाहाची तयारी वेगाने सुरू होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांना लग्नपत्रिकावाटप झाल्या होत्या.

बुधवारी सकाळी नियोजित वर भावेश महाजन काका ज्ञानेश्वर महाजन यांच्या घरी गेला आणि ‘तुमची मोटारसायकल द्या, मी नाश्ता करायला जात आहे’, असे सांगून गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही भावेश मोटारसायकल घेऊन न आल्याने ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशाच्या घरी जाऊन चौकशी केली असता, तो अद्याप घरी आला नसल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. काही वेळानंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी ज्ञानेश्वर महाजन यांनी मोबाईल करून भावेश धरणगाव रस्त्यावरील सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून, त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर महाजन नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले. भावेश यास परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्यास ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पाच दिवसांनंतर मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आनंदात होते. मात्र, नियतीने काही क्षणातच महाजन परिवाराचा आनंद हिसकावून घेतला आणि सर्व परिवाराला दुःखाच्या खाईत लोटून दिले. याबाबत ज्ञानेश्वर महाजन यांनी दिलेल्या माहितीवरून येथील पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT