Bharita brinjal on sale 
जळगाव

Brinjal Rate: भरिताची वांगी 40 रुपये किलो; पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले

सकाळ वृत्तसेवा

Brinjal Rate : दिवाळी झाल्यानंतर थंडीची हुडहुडी वाढू लागली आहे. दिवाळीनंतरच थंडीच्या महिन्यात भरिताची वांगी दाखल होतात. येथील बाजारपेठेत असोदा, बामणोद, भालोद येथील भरिताची वांगी दाखल झाली आहेत. (brinjal rate 40 rupees per kg in jalgaon news)

साधारणपणे भरिताची वांगी ३५ ते ४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. बामणोद, भालोद येथील वांग्यांचे दर मात्र ६० ते ७५ रुपये किलो असा आहे.

भरीत पार्टीची रंगतच न्यारी असते. या महिन्या मात्र पोषक वातावरण, थंडीमुळे वांग्याचे उत्पादन वाढले आहे. सध्या हे दर २५ ते ३५ लो आहेत. तर भालोद, बामणोद (ता.यावल) येथील वांग्याचे दर ६० ते ७५ रुपये किलोपर्यंत आहेत.

भरितासाठी आसोदा, भालोद व बामणोद वांगी प्रसिद्ध आहेत. या गावांची 'भौगोलिक, जमिनीचा प्रकार व हवामान यामुळे वांगी चवीला चांगली असतात.

बामणोद, भालोद व आसोदा येथील वांगे आकाराने मोठे व लांबोळे, मऊ व लुसलुशीत आणि वजनाने हलके असते. त्यात बियांपेक्षा गर जास्त असतो. एका किलोमध्ये साधारण चार ते पाच वांगे सहज बसतात.

ही वैशिष्ट्ये व चवीमुळे येथील वांगे ग्राहकांच्या पसंतीस पडतात. खानदेशी पद्धतीने भरीत तयार करताना कांद्याची पात हा अत्यावश्यक घटक आहे. सध्या बाजारात वांगे स्वस्त असले तरी कांद्याची हिरवी पात तब्बल ६५ ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT