Brutal murder of young man in Jalgaon due to previous enmity crime news 
जळगाव

Jalgaon Crime News: पूर्ववैमनस्यातून जळगावात तरुणाचा निर्घूण खून; संशयिताच्या शोधासाठी गुन्हेशाखेची पथके रवाना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील समतानगर येथे रविवारी (ता. १०) दुपारी जुन्या वादातून तरुणाचा चॉपरने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली.

अरुण बळिराम सोनवणे (वय २८, रा. समतानगर) असे मृताचे नाव असून, अरुणला वाचवण्यास गेलेले दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Brutal murder of young man in Jalgaon due to previous enmity crime news)

अरुण सोनवणे याचा काही तरुणांसोबत जुना वाद होता. हाणामारीनंतर प्रकरण पोलिसांत पोचले. मात्र हा वाद मिटविण्यात आला होता. वाद मिटल्याचे अरुण व त्याच्या भावांना वाटत असतानाच रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अरुणला वाद मिटविण्यासाठी काही जणांनी वंजारी टेकडीवर बोलावले होते.

अरुण तेथे एकटाच गेला असता चार ते पाच जणांनी त्याच्यावर चॉपरने वार करून खून केला. अरुणला वाचवताना त्याचा भाऊ गोकुळ बळिराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेही गंभीर जखमी झाले.

अरुणसह जखमींना वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी अरुण सोनवणेला मृत घोषित केली. समतानगरातील तरुणांसह मित्रपरिवार आणि नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

मृत अरुण खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. काही महिन्यापूर्वीच त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. तो गाफील राहिल्याने त्याची हत्या झाली.

जिल्‍हा रुग्णालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड ॲक्शन फोर्ससह अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली होती. संशयितांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुन्हेशाखची पथके रवाना केली. संशयितांना लवकरच अटक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुबई एअर शोदरम्यान मृत पावलेले विंग कमांडर नमन स्याल कोण होते? पत्नीही वायूदलात अधिकारी...

Love Rashifal 2025: डिसेंबरमध्ये गुरू व चक्र ग्रहाचे भ्रमण! ‘या’ राशींच्या प्रेमजीवनात येणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : सिन्नरच्या नायगावात गावगुंडांचा कहर! पन्नास हजारांची खंडणी न दिल्यास दुकान पेटवण्याची धमकी

Maharashtra Politics: राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ! भाजपला झटका, अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

PM किसानचे 2000 रुपये अजून आले नाही? झटपट 'इथे' करा तक्रार; एका मिनिटात येतील पैसे..

SCROLL FOR NEXT