Bhavesh Bhalerao esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळला तरुणाचा निर्घृण खून

मित्रांमध्ये झालेल्या वादातून फेकरी येथील तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील फेकरी शिवारातील रेल्वे प्रशिक्षण केंद्राजवळील भगवान सावळे नगर भागात उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : मित्रांमध्ये झालेल्या वादातून फेकरी येथील तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील फेकरी शिवारातील रेल्वे प्रशिक्षण केंद्राजवळील भगवान सावळे नगर भागात उघडकीस आली.

भावेश अनिल भालेराव (वय २६, रा. भगवान साळवे नगर, फेकरी), असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मानेवर व शरीरावर चाकूने सपासप वार करून काटेरी झुडपात फेकून देण्यात आले. (Brutal murder of youth in Bhusawal jalgaon crime news)

येथील रेल्वे प्रशिक्षण केंद्र (झेडआरटीसी) जवळील काटेरी झुडपात अनेक दिवसांपासून जुगार क्लब सुरू असून, नेहमी आठ ते दहा जण क्लबमध्ये जुगार खेळत असतात.

याच परिसरात भावेश अनिल भालेराव (वय २६) या तरुणाच्या मानेवर चाकूने सपासप सात वार करून त्याचा खून करण्यात आला. क्लबमधील पैशांच्या वादातून, तसेच पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भावेश भालेराव याच्या कपाळावर व डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी रॉडने वार केले आहेत. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना तालुका पोलिस ठाणे हद्दीत घडली असून, यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना सायंकाळी साडेचारला माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे.

पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, प्रेम सपकाळे, श्यामकांत मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना तसेच श्वान पथकाला पाचारण केले असून, खुनाच्या घटनेचा कसून तपास सुरू आहेत. मृत भावेश भालेराव याला शवविच्छेदनासाठी ट्रामा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. या घटनेत संशयित आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर एक आव्हान उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT