road development in jalgaon
road development in jalgaon esakal
जळगाव

Budget 2023 : रस्ते विकासाचा बॅकलॉग भरुन निघणार; ग्रामीण भागातील 100 कोटींच्या कामांना मंजुरी!

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केला. ज्यात राज्याच्या हितासाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. (budget 2023 MLA Mangesh Chavan statement about road development jalgaon news)

या अर्थसंकल्पात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील रस्ते व विकासकामांसाठी तब्बल शंभर कोटीच्या भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्था झाल्याने या रस्त्यांच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. या पार्श्‍वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद झाल्याने आपल्या मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. यामुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा बॅकलॉग भरून निघेल असे सांगून आमदार चव्हाण यांनी सांगितले, की वेगवान महाराष्ट्र संकल्पना साकार करण्यासाठी ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

मागीलवर्षी चाळीसगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्गांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती झाली आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात ६८ कोटीचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांना आजतागायत तुटपुंजा निधी मिळत असल्याने वर्षानुवर्ष रस्त्यांची कामे पूर्ण होत नव्हती.

माझ्यासह अनेक सदस्यांच्या सूचनेची दखल घेत, यंदाच्या अर्थसंकल्पात प्रथमच जिल्हा परिषेदच्या अंतर्गत ३१ ग्रामीण मार्गाना ३२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची कामे सुरु केली जातील.

एकट्या चाळीसगाव मतदारसंघातील रस्त्यांना १०० कोटींचा निधी मंजूर झाल्याने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमधील रस्त्यांसह जोडरस्ते, रस्त्यांना संरक्षण भिंत, स्लॅब ड्रेनचे बांधकाम, जलनिःस्सारणाचे काम यासह इतरही अनेक कामे लवकरच केली जाणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT