amalner Municipal building.
amalner Municipal building.  esakal
जळगाव

Jalgaon News : रस्त्यांमुळे अमळनेर पालिकेवर बोजा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शहरासाठी चार रस्त्यांना सुमारे ७० कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी या कामासाठी सुरवातीला नगरपालिकेला १० कोटीचा स्वनिधी भरावा लागणार आहे.

सद्यःस्थितीत आर्थिकदृष्टया पालिका सक्षम नसल्याने रस्ते विकास प्रकल्पावर पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.(Burden of Amalner Municipal due to roads jalgaon news)

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेला चार रस्त्यांसाठी विकास निधी म्हणून ७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांना प्रशासकीय मान्यता देखील दिलेली आहे. एकूण ७० कोटीच्या या कामात ८५ टक्के म्हणजे ६० कोटी रुपये राज्य शासन तर १५ टक्के म्हणजे १० कोटी रुपये पालिकेला स्वनिधी म्हणून आधी बँकेत जमा करावा लागणार आहे.

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर नगरपरिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की नगरपालिका पाणीपुरवठा वीज देयक पोटी २५ कोटी, जलसंपदा पाणीपुरवठ्‍याचे दोन कोटी, पाणीपुरवठा थकीत कर्ज ४ कोटी, पालिका कर्मचारी प्रलंबित देयके आठ कोटी, प्रलंबित दावे पोटी १५ कोटी आणि अपरिहार्य खर्चासाठी ६ कोटी मिळून अशी सुमारे ६१ कोटीची नगरपालिकेला गरज असताना पुन्हा रस्ते विकासासाठी १० कोटी देणे म्हणजे नगरपरिषदेवर प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे.

व्यापक जनहिताच्या दृष्टीने विचार करून चार रस्त्यांचा हा विकास प्रकल्प नाकारण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रती साहेबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नगरविकास विभागाला पाठविल्या आहेत.

''शासन नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना यासह इतर योजनेतून पैसे देत असते. नगरपरिषदेला देखील या योजनेंतर्गत येणाऱ्या विकासकामांसाठी काही न काही हिस्सा द्यावाच लागतो. त्यामुळे आवश्यक विकासकामे करताना पालिका त्यांच्या हिश्याची व्यवस्था करेलच.''- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, अमळनेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT