ऐनी डेक्स sakal
जळगाव

जळगाव : ‘ऐनी डेक्स’द्वारे औषध विक्रेत्याला गंडवले

केवायसीच्या नावाने सायबर गुन्हेगाराकडून पन्नास हजारांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मोबाइल क्रमांकाचे केवायसी करण्याच्या बहाण्याने औषध विक्रेत्यास ४९ हजार ५०० रुपयात ऑनलाइन गंडवल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाजवळील हिरापन्ना अपार्टमेंटमध्ये प्रभाकर कोल्हे (वय ६७) कुटुंबासह वास्तवास आहे. त्यांचे जयकिसनवाडीत औषध विक्रीचे दुकान (मेडिकल)आहे. सोमवारी (ता. १३) दुपारी नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानांवर काम करत असताना त्यांच्या मोबाइलवर संदेश (एसएमएस) आला. या संदेशात मोबाइल क्रमांक केवायसी करा व त्यासाठी एका नंबरवर फोन करण्याबाबत नमूद होते. त्यानुसार प्रभाकर कोल्हे यांनी एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाईलवर बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने कोल्हे यांना बोलण्यात घेत विश्वास संपादन केला. त्यांना ‘ऐनी डेक्स’नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले.

कोल्हे यांनी अॅप डाऊनलोड केले त्यानंतर संबंधितांनी डेबीड कार्डच्या माध्यमातून दहा रुपयांचे चलन भरल्यास सांगितल्यावर ते सुद्धा कोल्हे यांनी भरले. ही प्रक्रिया करताच कोल्हे यांना त्यांच्या बँकेच्या खात्यातून २४ हजार ५००, २० हजार व ५ हजार अशा पद्धतीने एकूण ४९ हजार ५०० रुपये विड्रॉल झाल्याचे संदेश आले. फसवणुकीची खात्री झाल्यावर प्रभाकर कोल्हे यांनी तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.

काय ? आहे ऐनी डेक्स

‘ऐनी डेक्स’ हे, असे ऑनलाइन ॲप्लीकेशन आहे, की ज्याच्या मोबाईलमध्ये, संगणकात ते डाऊनलोड केल्यानंतर संबंधित व्यक्ती (सायबर गुन्हेगार) त्याच्या संगणकाचा आणि मोबाईलचा ताबा मिळवतो. संगणकातील महत्त्वाची माहिती व्हिडिओ डाटा कॉपी करू शकतो, त्याच बरोबर बँकखात्याशी लिंक असलेल्या अॅड्राईड मोबाईलच्या माध्यमातून बँकखात्यात झाडू मारुन सर्व रक्कम आपल्याकडे वळती करून घेतली जाते. कोणत्याही संदेशद्वारे ‘अेनी डेक्स’डाऊनलोड करण्याचे सांगत असेल किंवा कुठलीही लिंकवर क्लिक करण्यास सांगत असेल तर मुळीच करू नका अन्यथा नुकसानाला समोरे जावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT