Jalgaon District Bank esakal
जळगाव

Jalgaon District Bank : कर्जासाठीसाठी शेतकऱ्यांना लागणारी प्रोसेसींग फी रद्द

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या कर्जासाठी शेतकऱ्यांना लागणारी प्रोसेसिंग फि आता रद्द करण्यात आली आहे. एटीएमची मुदत संपल्यामुळे सद्यस्थितीत कर्जाची रक्कम बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे.

याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकित एकमताने घेण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. (cancel of processing fees for farmers for loans jalgaon news)

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी (ता. ६) श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देतांना पवार म्हणाले की, कर्जासाठी लागणारी २३६ रूपये प्रोसेसिंग फि रद्द करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्याबाबत बैठकित चर्चा होऊन ही फी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

कर्जाची रक्कम बचत खात्यात

जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम एटीएमद्वारे देण्यात येते. मात्र सद्यस्थितीत एटीएम कार्डची मुदत संपलेली आहे. नवीन कार्ड लवकरच वितरीत करण्यात येणार आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांचे कर्ज त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल. त्यांना बँकेतून स्लीपद्वारे ही रक्कम देण्यात येईल. या प्रस्तावालाही संचालकांनी एकमताने मंजुरी दिली.

नवीन कर्मचाऱ्यांना पगारवाढ

जिल्हा बँकेत नुकतीच नवीन कर्मचारी भरती झाली आहे. त्यांना पगारवाढ देण्याचा प्रस्ताव होता. त्याबाबत माहिती देतांना पवार यांनी सांगितले कि पगारवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बाहेरील संस्थांना कर्जासाठी एनओसी

जिल्ह्याबाहेरील संस्थांच्या कर्जाबाबत माहिती देताना पवार म्हणाले, की जिल्हाबाहेरील ज्या संस्थांना बँकेकडून कर्ज घ्यावयाचे असेल, त्यांना आता जिल्हा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे. या प्रस्तावालाही एकमताने मंजूरी देण्यात आली.

कुक्कम कंपनीचा प्रस्ताव मागे

जळगाव येथील कुक्कम कंपनीने कर्ज मागणीचा प्रस्ताव दिला होता. त्याबाबत ते म्हणाले की, कंपनीने हा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी मेलद्वारे हा प्रस्ताव मागे घेतल्याचे कळविले. त्यामुळे तो प्रस्तावच रद्द करण्यात आला.

या वेळी एकनाथ खडसे, आमदार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, शैलजा निकम, अनील पाटील, किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, ॲड. रविद्र पाटील, प्रताप हरी पाटील, घन:श्‍याम अग्रवाल, प्रदीप देशमुख आदी संचालक उपस्थित होते.

महाविकासच्या संचालकांची बैठक

जिल्हा बँकेच्या बैठकिअगोदर महाविकास आघाडीच्या संचालकांची बैठक आमदार खडसे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या वेळी आमदार अनिल पाटील, श्‍यामकांत सोनवणे, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, ॲड. रविंद्रभैय्या पाटील, प्रदीप देशमुख आदी संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT