Cancel order of CCTV in the medical shop jalgaon sakal
जळगाव

जळगाव : मेडिकल दुकानात सीसीटीव्हीचा आदेश रद्द करा!

जिल्हा केमिस्ट संघटनेची मागणी ः ऑनलाइन नार्कोटिक औषधे विकताना सीसीटीव्ही लावणार का?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य शासनाकडून सर्व औषध दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. हा आदेश रद्द करावा, अशी मागणी बुधवारी (ता. ६) जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

राज्यात ऑनलाइन फार्मसी व वेबसाइटद्वारे कायद्यात तरतूद नसतानादेखील बेकायदा पद्धतीने औषधविक्री केली जात आहे. अशा ऑनलाइन फार्मसीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडून कोणतेही बंधन नाही. अनधिकृत डॉक्टरसुद्धा त्यांच्या पेशंटला कोणत्याही प्रकारचे परवाने नसतानादेखील औषध विक्री करीत आहेत. त्यांनादेखील वरील नियमांचे कोणतेही बंधन नाही. असे असताना फक्त मेडिकल स्टोअर्सलाच बंधन का?

शासनाकडून मेडिकल स्टोअर्सधारकांसाठी भेदभाव करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे केमिस्ट बांधवांकडून विरोध व नाराजी दर्शविण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडून आलेले आदेश फक्त औषध दुकानांना बंधनकारक का, असा प्रश्‍न जिल्ह्यातील सर्व केमिस्ट संघटनेला विचारत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे केमिस्ट बांधवांना बंधनकारक आदेश काढून त्यात शासनास काय साध्य होईल? तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा बॅकअप स्टोअरेज किती दिवसांचा असावा, असे आदेशात कुठेही नमूद नाही. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन आपल्या माध्यमातून राज्य शासनास जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्सच्या सभासदांतर्फे आदेश रद्द करण्याची मागणी राज्य शासनास कळविण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झंवर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT